मुंबई काँग्रेसतर्फे जन जागरण अभियानांतर्गत आज चांदिवली विधानसभा मतदार संघात महागाईच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या अभियानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मो.आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक-164 मध्ये पदयात्रा काढण्यात आली .
यावेळी मोदी सरकारने कृत्रिमरीत्या वाढविलेल्या महागाईच्या विरोधात प्रभागातील गल्ली गल्लीत घोषणाबाजी करण्यात आली.
या जनजागरण अभियान पदयात्रेत मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मो .शरीफ खान, प्रदेश प्रतिनिधी वजीर मुल्ला, बल्ले सिंग उत्तर मध्य मुंबई जिल्हा पदाधिकारी हैदर अली शेख ,जमाल खान, सलीम मिया शेख ,मुर्तुजा अन्सारी ,इरफान खान, रमजान शेख ,हरीश दुबे, अल्पसंख्याक महासचिव रिजवान हैदर ,महिला तालुका अध्यक्षा माया खोत, ब्लॉक अध्यक्ष अशोक पोळ, असलम खान ,सईद खान, कार्याध्यक्ष वारिस खूरेशी, तबरेज खान,महिला ब्लॉक अध्यक्षा कमरूननिशा शेख , ब्लॉक काँग्रेसचे, वरिष्ठ नेते व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments